महिला कॉन्सटेबलसोबत अंघोळ, व्हिडीओत अश्लिल चाळे



राजस्थान पोलीसांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी एक घटना समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ह्या व्हिडीओत एक डीएसपी एका महिला कॉन्सटेबलसोबत नग्न अंघोळ करत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ एका स्विमिंग पूलमधला आहे. विशेष म्हणजे दोघांचे अश्लिल चाळे सुरु असताना त्याच पूल मध्ये एक सहा वर्षाचा मुलगाही आहे. त्याच्यासमोर ह्या सगळ्या लीला सुरु होत्या. शेवटी राजस्थान पोलीसनं संबंधीत डीएसपी आणि महिला कॉन्सटेबलवर कारवाईचा बडगा उचललाय.


नेमकं काय आहे व्हिडीओत?

2 मिनिट 38 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. उदयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये हा व्हिडीओ शुट केल्याचं आता उघड झालंय. ह्या व्हिडीओत कथितपणे DSP हिरालाल सैनी आणि एक महिला कॉन्सटेबल एकत्र अंघोळ करताना दिसतायत. त्याच व्हिडीओत एक सहा वर्षाचा मुलगाही आहे जो त्यांच्याच बाजूला फुग्यासोबत खेळतोय. डीएसपी आणि महिला कॉन्सटेबल फक्त स्विमिंग पूलमध्ये पोहत असते तर कदाचित कुणी आक्षेप घेतला नसता पण त्या 6 वर्षाच्या मुलासमोर हे दोघेही नग्न अवस्थेत अश्लिल चाळे करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ह्या अश्लिल व्हिडीओवर राज्य बाल संरक्षण आयोगनं आक्षेप घेत कारवाईचे आदेश दिलेत. तीन दिवसात पोलीस अधिक्षकांना चौकशी रिपोर्ट दाखल करायला सांगितला गेलाय.

डीएसपी आणि महिला कॉन्सटेबलवर कारवाई

डीएसपी हिरालाल सैनी आणि त्या महिला कॉन्सटेबलला निलंबीत करण्यात आलंय. ते ज्या रिसॉर्टवर थांबले होते त्यावर छापा टाकून पोलीसांनी सैनीला ताब्यात घेतलं. त्यानंतर विभागीय चौकशी सुरु केली गेलीय. महिलेला मात्र अटक करण्यात आली नाही. तिच्यासोबत सहा वर्षाचा मुलगा असल्यामुळेच अटक झाली नसावी असा अंदाज आहे.


पतीची तक्रार

महिला कॉन्सटेबलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या पतीनं पोलीसात तक्रार दाखल केलीय. तक्रारीत त्यानं म्हटलंय की, 2001 मध्ये त्याचं कुचामन सिटीतल्या एका मुलीशीही लग्न झालं. त्यानंतर तिला 2008 मध्ये राजस्थान पोलीसमध्ये नोकरी लागली. 2015 साली त्यांना एक मुलगाही झाला. हा तोच मुलगा आहे जो त्या अश्लिल व्हिडीओत दिसतो आहे. नवऱ्याच्या तक्रारीनुसार ह्या व्हिडीओमुळे त्याची आणि मुलाची बदनामी झालीय. याची तक्रार देण्यासाठी तो नागौरच्या पोलीस ठाण्यात गेला पण तिथं पोलीसांनी त्याची तक्रार दाखल करुन घेतली नाही. कारण प्रकरण डीएसपीशी संबंधीत होतं. पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रकाश मीना यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. प्रकरण पेटल्यानंतर महिला कॉन्सटेबलच्या पतीची तक्रार दाखल करुन घेऊन डीएसपीसहीत महिला कॉन्सटेबलवर रितसर कारवाई, चौकशी सुरु झालीय. सध्या दोघेही निलंबीत असून दोघांनाही संबंधीत कार्यालयात हजेरी लावण्यात आलीय.