रजनीताई पाटील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार
कॉंग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहे. त्या केज-अंबाजोगाई येथील नूकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात पडत असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रजनीताई पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारी दाखल केली होती. मात्र भाजप उमेदवारांने उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर रजनीताई पाटील प्रथमच बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहे. बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील नूकसानग्रस्त भागाचा दौरा आयोजीत केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा