जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी



राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान सर्वांना या दोघांच्या कामांचा सपाटा पाहायला मिळाला. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क रात्री १०.३० वा. जलसंपदा विभागाची बैठक घेतली. 


यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोक-प्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.