राहुरी फॅक्टरी परिसरात बिबट्या मादी मृत अवस्थेत आढळली



राहुरी फॅक्टरी परिसरात बिबट्या मादी मृत अवस्थेत आढळली

राहुरी फॅक्टरी परिसरात ६ महिन्यांची बिबट्या मादी मृत अवस्थेत आढळून आली आहे. 

राहुरी तालुक्यात दि. १ जानेवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीत बिबट्याच्या मृत्यूची ही सहावी घटना घडली आहे.

या घटनेची खबर स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

शव विच्छेदनानंतर शुक्रवारी बिबट्याच्या या मादीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान या मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शव विच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.