....नावाने फेसबुक अकाऊंट काढून अश्लील फोटो केले शेअर; नातेवाईकाला अटक



तरुणाने महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करत त्यावर अश्लील पोस्ट, छायाचित्र पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी आवळल्या. ऋषिकेश अनिल वायखिंडे ( वय २३ रा. दौंड, जि. पुणे) असं आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, अज्ञात इसमाने तिच्या फोटोचा व नावाचा वापर करुन सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले. त्यावर तक्रारदार महिलेचा संपर्क क्रमांक देऊन बनावट खात्यावरुन अज्ञात लोकांना, तसेच तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. बनावट खात्यावर वेगवेगळ्या महिलांचे अश्लील फोटोही पोस्ट करण्यात आले होते.