राफेल व्यवहाराची चौकशी का नाही ? महसूलमंत्र्यांचा सवाल
▶️ 'फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही ?, असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. 'सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणीही त्यांनी केली.
📌व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा
'युपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते,' असे सांगतानाच थोरात म्हणाले, 'मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला.'
🧐मंत्री थोरात म्हणाले
'राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. भारतात राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल, तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे.'
टिप्पणी पोस्ट करा