विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने केले दिवाळखोर घोषित



देशाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर म्हणून घोषित केले.

कोर्टाच्या या निकालामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचेही मार्ग खुले झाले आहेत.

विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती.

भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं.

लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात मल्ल्या एक अपील करू शकतो.