प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या चेहऱ्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल ९ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिले आहेत. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होते. यामध्ये नारायण राणे, प्रीतम मुंडे, हिना गावित, कपिल पाटील आदी नेत्यांचा समावेश होता. मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून मागे पडल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटलं की, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली, ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.
टिप्पणी पोस्ट करा