बाळ सापडलं नाही तर आत्महत्या करेन, मुलाचा वडील रडू लागला
घरची परिस्थिती कितीही नाजूक किंवा बेताची असली तरी आई-वडील आपल्या मुलांसाठी झठतात. त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करतात. पैशांअभावी पालकांना अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. ते तडजोड करतात आणि आपल्या मुलांना हव्या त्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने पैशांच्या लालसेपोठी तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बाळाला विकल्यानंतर तिने मुलाचं अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी अवघ्या एक तासात घटनेचा उलगडा केला
बाळ सापडलं नाही तर आत्महत्या करेन, मुलाचा वडील रडू लागला
गोरखपूरच्या अलाहीबाग भागात संबंधित घटना घडली. सलमा खातून नावाच्या महिलेने अवघ्या 50 हजार रुपयांसाठी आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं. त्यानंतर तिने मुलाचं अपहरण झाल्याचं पोलीस आणि तिच्या पतीला सांगितलं. मुलाचा वडील मात्र बाळासाठी रडत होता. मुलगा सापडला नाही तर आत्महत्या करेन, असं मुलाचा वडील म्हणाला होता. त्यामुळे सलमाने बाळाचं अपहरण झाल्याची खोटी माहिती पोलिसांना आणि पतीला सांगितली (three month old child sold by mother for 50 thousand rupees).
महिलेने पोलिसांना नेमकं काय सांगितलं?
“मी मुलाला कडेवर घेऊन शहनाई मॅरेज हॉलजवळ रस्त्याने चालत होती. त्यावेळी अचानक तिथे एक चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून एक लाल साडी नेसलेली महिला बाहेर आली. तिने माझ्या हातून बाळाला खेचलं. त्यानंतर ती गाडीत बसली आणि गाडीने पळून गेली”, असं महिलेने पोलिसांना सांगितलं.
पोलिसांना तपास कसा लावला?
महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस कामाला लागले. पोलिसांनी अवघ्या एक तासात घटनेचा उलगडा केला. त्यासाठी त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. मात्र, तशी काहीच घटना सीसीटीव्हीत दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी सलमाची चौकशी केली. यावेळी सलमाने पोलिसांना खरं सांगितलं. पोलिसांनी सलमा आणि बाळ विकत घेणाऱ्या दोघी महिलांना अटक केली. त्यानंतर दोघी महिलांना जामीनावर सोडलं. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिला असं वागूच कसं शकते? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.
सलमाचं म्हणणं ऐकून पोलीसही चक्रावले
सलमा हिला 4 मुलं आहेत. त्यामुळे तिने सर्वात लहान चौथ्या नंबरचा मुलगा विकण्याचं ठरवलं. आणखी मुलगा हवा असेल तेव्हा आणखी एका मुलाला जन्म देऊ शकतो, असा विचार तिने केला होता. हे सर्व तिने पोलिसांना सांगितलं. या सगळ्या गोष्टी ऐकून पोलीसही चक्रावले.
टिप्पणी पोस्ट करा