गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला खून प्रकरणी अटक!
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी खून केल्याप्रकरणी अटक केली आहे.
शुभमने कानशिलात मारल्याचा रागातून एकाची हत्या केली आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. तीन तरुणांनी मिळूनच आपल्याच मित्राचा खून केला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडसह पुणे शहर हादरले आहे.
शुभम फुगे आणि अमन सुरेश डांगळे हे दोघे जण दारु पित बसले होते. दारु पिताना या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला.
या वादात अमनने शुभमच्या कानशिलात लगावली. याचाच राग शुभमला अनावर झाल्याने याच रागात इतर दोन मित्रांच्या साथीने अमनची हत्या केली.
सुरुवातीला वेगळे कारण पुढे आले होते. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास अमनचा मृतदेह भोसरी गावठाण परिसरात आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला.
भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा पाठीमागे शस्त्राचे वार होते. अमनचा मोबाईल तपासला तेव्हा मध्यरात्री दोन वाजता पत्नी आणि लातूरहून आणखी एकाचा फोन आला होता.
पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरु केला. मात्र तपासा दरम्यान शुभमच्या नावाचा देखील उल्लेख झाला. त्यानंतर पोलिसांनी शुभमसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
टिप्पणी पोस्ट करा