शेळी गट योजनेत प्रशासनाकडूनच बनवाबनवी



● बीड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर शेळी गट वाटपाचा कार्यक्रम राबविला जातो. यासाठी शेतकऱ्यांना १० शेळी आणि १ बोकड असा गट दिला जाणार होता. 

● तशी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले, लॉटरी पद्धतीने निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेळी गट वाटप करताना आता शासकीय परिपत्रकाची ढाल करीत प्रशासनाने बनवाबनवी सुरु केली आहे. 

● शेतकऱ्यांना १० शेळी आणि १ बोकड न देता ८२ हजाराच्या रकमेत ३६८ रुपये प्रतिकिलो वजनाप्रमाणे जितके वजन होईल तितक्याच वजनाच्या शेळ्या दिल्या जात आहेत. यामुळे अनेकांना केवळ ६-७ शेळ्यांवर समाधान मानावे लागत आहे.

● जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या शेळी गट वाटप योजनेतील प्रशासकीय बनवाबनवी आता शेतकऱ्यांसाठी अडचणींचा विषय ठरली आहे. पशु संवर्धन विभागाने जाहिरात देताना त्यात १० संगमनेरी किंवा उस्मानाबादी शेळ्या आणि १ बोकड अशी जाहिरात दिली होती. 

● याची एकत्रित किंमत ८३ हजार रुपये ठरविण्यात आली. यातील अर्धी रक्कम लाभार्थ्याने भरायची आणि त्यानंतर त्याला पशुसंवर्धन विभागामार्फत शेळ्या दिल्या जातील असे सांगण्यात आले होते. 

● मात्र प्रत्यक्ष वाटप करताना आता १० शेळ्या आणि १ बोकड देण्याऐवजी २६८ किलो वजनाच्या मर्यादेत जितक्या शेळ्या आणि बोकड बसतील तितक्याच दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतर त्यांना वजनाची ही गोष्ट सांगितली जात आहे.