अभिनंदन भाजपाला टिम देवेंद्र टिम नरेंद्र मान्य नाही -पंकजा मुंडे
आम्ही लोकांमध्ये काम करतो. मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षाला आयुष्य दिलं आहे. त्यामुळे आमच्या नावाची नेहमी चर्चा होते.
प्रितम यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. नवीन मंत्र्यांना फोन करून अभिनंदन केलं आहे, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर आज मौन सोडलं.
भाजपाला टिम देवेंद्र टिम नरेंद्र मान्य नसल्याचे सांगून भाजप एकसंघ आहे. भाजपाला मला संपवायचे आहे, असे मला तिळमात्र वाटत नसून वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. आज अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडत पत्रकार परिषद घेतली.
या वेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असून तो मला मान्य आहे. पक्षाने नवीन लोकांना संधी दिली आहे. त्यातून पक्षाचे मत वाढले तर मला अधिक आनंद होईल.
प्रितम मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत, पक्षासाठी त्या मेहनत घेत आहेत. सुशिक्षित आहेत म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होते.
टिप्पणी पोस्ट करा