दाम दुप्पटचे आमिष देऊन 99 जणांना फसवले, अखेर मेरिट लँडमार्क कंपनीवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल



● प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम जमा करत जा, पाच वर्षानंतर रक्कम दुप्पट करुन देवू अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देवू असे आमीष दाखवून मेरिट लँडमार्क या कंपनीने ९९ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

● शनिवारी बीड शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील जालना रोड भागात मेरिट लँडमार्क या कंपनीने २०१४ मध्ये कार्यालय थाटले होते. 

● या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकीवर चांगले व्याज देण्याचे अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देण्यात येईल असे सांगण्यात येत होते. त्यावर विश्वास ठेवत बीड जिल्ह्यातील अनेकांनी गुंतवणूक केली . 

● त्यानंतर २०१७ मध्ये हे कार्यालय बंद करण्यात आले. पुढे अनेकांनी पुणे येथे जावून नियमीतपणे रक्कम जमा केली. 

● कालावधी पुर्ण झाल्यानंतर गुंतवूणकदारांनी कंपनीकडे रक्कम अथवा प्लॉटची मागणी केल्यानंतर त्यांनी सध्या कोरोना लॉकडाऊन असल्याचे कारण पुढे केले. 

● दरम्यानच्या काळात या कंपनीचे चेअरमन, संचालक यांचे मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने गुंतवणुकदारांनी पुण्यात धाव घेतली असता तेथे कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले .