समाज हितासाठी सतराशे साठ गुन्हे अंगावर घ्यायला तयार - आ.धस
आष्टी तालुक्यामध्ये जामखेड आष्टी मार्गावर असलेल्या पोखरी. दरम्यान असलेल्या रोडवर अरुंद रस्त्यामुळे व चुकीच्या वळण मुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध झालेल्या अपघातांमध्ये सोळा लोकांना आपला जीव गमवावा लागला.
हे लक्षात घेता मी संबंधित बांधकाम निघावा विभागाला या गोष्टीच्या पूर्ण माहिती देऊन हा रस्ता रूंदावना यामध्ये रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्या काही लोकांचे कोणाचे वॉल कंपाऊंड पाण्यात आहे.
मात्र, या लोकांनी या गोष्टीला राजकीय रंग देऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला मात्र अशा गुन्ह्याला सुरेश धस कधीच भीक घालत नाही समाज हितासाठी आपण आपल्या अंगावर सतराशेसाठ गुन्हे घ्यायला तयार आहोत
असे आमदार धस यांनी धस कन्सट्रक्शन व फोटोग्राफी या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे ऍड. रावसाहेब जगताप मोहन झांबरे, भारत मुरकुटे, सभापती बद्रीनाथ जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आज माझ्या गावातील धन्यकुमार धस व अशोक धस या शेतकर्यांचे मुले आज एक इंजिनियर तर दुसरा फोटोग्राफर झाला आहे जामगाव गाव कुठेतरी आता वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहे.
टिप्पणी पोस्ट करा