राम मंदिराची जमीन २० लाखाची अडीच कोटीची कोणी घेतली वाचा सविस्तर



अयोध्या : राजधानी लखनौमध्ये संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) अयोध्येत भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय यांचे पुतणे दीप नारायण यांच्याकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी अवघ्या 20 लाख रुपयात खरेदी केली होती. मग ती राम मंदिर ट्रस्टला 11 मे 2021 रोजी अडीच कोटींमध्ये विकली. त्याचप्रमाणे अयोध्याच्या कोट रामचंदरमधील जगदीश प्रसाद यांना 14.80 लाखांची जमीन महंत देवेंद्र प्रसाद यांच्याकडून 10 लाख रुपयांना मिळते. मात्र, रामजन्मभूमी ट्रस्टला 1 कोटी 60 लाखांची जमीन 4 कोटींना दिली जाते, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे महापौर आणि त्याचा पुतण्या सामील असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.


चौकशीची मागणी

संजय सिंह म्हणाले, 'राम मंदिर जमीन घोटाळ्याचा आरोप असलेल्या भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि विश्वस्त यांच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांची चौकशी करण्याची मागणी योगी सरकारकडे आम आदमी पार्टीने केली आहे. ज्यामुळे देणगी चोरीचा संपूर्ण खेळ उघडकीस येईल.' तसेच, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून राम मंदिराच्या नावावर जमीन खरेदी घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी करून आरोपींना त्वरित तुरूंगात पाठवावे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.

भाजपावर निशाणा

भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाचार करत आहेत. यामुळे अयोध्येत राम मंदिर बांधण्यास विलंब होत आहे. राम मंदिराच्या नावावर 2 कोटींची जमीन 18.5 कोटींमध्ये विकली गेल्याच्या खुलाशाच्या 6 दिवसानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे सरकार या देणगी चोरांना वाचवू इच्छित असल्याचे सिद्ध होते. ज्यावेळी भाजपा नेते देणगी चोरीमध्ये सामील होतात, मग सरकार त्यांच्याविरोधात कारवाई तरी कशी करू शकेल?, असा सवाल संजय सिंह यांनी केला आहे.