VIDEO : बीडमध्ये पोलीस आणि पारधी समाजातील महिलांमध्ये खडाजंगी



● बीडमध्ये पोलीस आणि पारधी समाजातील महिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाली आहे. सिरसाळा येथील औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केलेली गायरान जमीन मोजणी दरम्यान हा प्रकार घडला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा :  

● बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या सिरसाळा गावात, सुज्जत अशी एमआयडिसी उभारली जाणार आहे. यासाठी शासनाने तब्बल ३५ हेक्टर गायरान जमीन, औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. 

● शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासह पोलीस प्रशासनाला तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या पारधी समाजातील महिलांनी विरोध केल्याने त्यांच्यामध्ये खडाजंगी पहायला मिळाली.

● दरम्यान तेथे आलेले कर्मचारी जमिनीची मोजणी करत त्या जमिनीवर असणाऱ्या घराची देखील मोजणी करत होते. 

● या जमिनीवर २० ते २२ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील महिला, मुली संतप्त झाल्या, तर एका वृद्ध महिलेने विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.