राज्यातील आयएएस IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या



महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

रणजीतकुमार, संचालक(माहिती तंत्रज्ञान) मंत्रालय मुंबई यांची नियुक्ती सहसचिव, मुख्य सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

प्रवीण परदेशी यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग या पदावर करण्यात आली आहे.

डॉ पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर करण्यात आली आहे.

व्ही पी फड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांची नियुक्ती सदस्य सचिव, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे.

राहुल गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद या पदावर करण्यात आली आहे.

मनुज जिंदाल, सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर करण्यात आली आहे.

श्रीमती मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी अमरावती यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या पदावर करण्यात आली आहे.