एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची झालीय बिकट अवस्था - Ranu Mandal, which became popular overnight, is in dire straits
रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जसा व्हायरल झाला तसे तिचे आयुष्य बदलले. पण हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. आता काही दिवसांतच रानूची अवस्था पुन्हा जैसे ते तैसे झाली आहे. इतकेच नाही तर आता पै पै मिळवण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. तिच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी पैसेदेखील नाही. रानू मंडलने जुने घर सोडले होते आणि ती नवीन घरी रहायला गेली होते. स्टार झाल्यानंतर रानूचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले जिथे ती लोकांशी उद्धटपणे वागताना दिसली होती. जसे लॉकडाउन सुरू झाले तर रानू मंडल पुन्हा जुने आयुष्य जगते आहे. फेब्रुवारीमध्ये रानूने आपले नवीन घर सोडले आणि पुन्हा जुन्या घरी परतली आहे.
एक वेळ अशी होती रानू मंडलच्या नावाचा सगळीकडे बोलबोला ऐकायला मिळत होता. इतकेच नाही तर सलमान खानदेखील रानूचे गाणे मोबाइलवर ऐकत होता आणि त्याचा हा व्हिडिओ समोर आला होता.
अशिया नेट न्यूजच्या रिपोर्टनुसार,लॉकडाउनदरम्यान रानू मंडलचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यात ती लोकांना दिलासा देताना दिसली होती. सोशल मीडियावर सर्वात आधी रानूचा परिचय करणाऱ्या अतींद्र चक्रवर्तीने सांगितले की, काही गरीब लोकांना रानू मंडलच्या घरी घेऊन गेली होती. रानूने असहाय्य लोकांसाठी गरजेचे सामानही विकत घेतले ज्यात तांदूळ, डाळ आणि अंड्याचा समावेश होता. पण लॉकडाउन एवढे मोठा चालेल याचा अंदाज नव्हता पण आता तिची परिस्थिती दयनीय झाली आहे.
असे सांगितले जात आहे ज्या पद्धतीने रानू एका रात्रीत लोकप्रिय झाली आणि काही तासातच यशाच्या शिखरावर पोहचली. त्यानंतर चाहत्यांसोबत उद्धटपणे वागणे रानू मंडलला चांगलंच भोवले आहे. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.
रानू मंडलची मुलगी एलिजाबेथने सांगितले होते की माझ्या आईचा एटिट्युड प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे नेहमी ती अडचणीत येते. पण तिने जीवनात खूप हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रानूच्या व्हिडिओवर जेव्हा हिमेश रेशमियाची नजर पडली तेव्हा त्याने त्याचा आगामी चित्रपट हॅप्पी हार्डी अँड हीरमध्ये दोन गाणी रेकॉर्ड केली होती. त्यानंतर तिची लोकप्रियता आणखीन वाढली.
मागील वर्षी ३१ डिसेंबरला मुंबईत एका खासगी टीव्ही चॅनेलवर वर्षाच्या शेवटी कार्यक्रमात सेलिब्रेटींच्या यादीत रानू मंडलच्या नावाचादेखील समावेश होता. या कार्यक्रमात अमिताभ बच्चनदेखील उपस्थित राहणार होते. पण चाहत्यांशी दुर्व्यवहार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी रानू मंडलचे नाव सेलिब्रेटींच्या यादीतून हटविले होते.
Ranu Mandal, which became popular overnight, is in dire straits
Ranu Mandal, who earns her living by singing at the railway station, became a star overnight. Her life changed as the video of the song on her platform went viral on social media. But these good days did not last forever. In just a few days, Ranu's condition has returned to normal. Not only that, but now she is struggling to make ends meet. She has no money to support herself. Ranu Mandal had left the old house and moved to a new house. After becoming a star, many of Ranu's videos went viral where she was seen behaving rudely towards people. As the lockdown begins, Ranu Mandal is living an old life again. Ranu left her new home in February and returned to her old home.
There was a time when the name of Ranu Mandal could be heard everywhere. Not only that, Salman Khan was also listening to Ranu's song on his mobile and this video of him came out.
It is said that Ranu became popular overnight and reached the pinnacle of success in a matter of hours. After that, Ranu Mandal has been treated well by the rude treatment of the fans. Her popularity was such that crowds of people were flocking to see her but she could not handle it all. There is talk that her old days are back due to misbehavior with fans, replying to media representatives.
Elizabeth, the daughter of Ranu Mandal, had said that my mother has an attitude problem and so she always gets in trouble. But she had to endure many hardships in her life. When Himesh Reshammiya saw Ranu's video that went viral on social media, he had recorded two songs in his upcoming film Happy Hardy and Heer. Since then, her popularity has skyrocketed.
Ranu Mandal's name was also included in the list of celebrities in a year-end show on a private TV channel in Mumbai on December 31 last year. Amitabh Bachchan was also expected to attend the event. But after abusing the fans, the authorities had removed Ranu Mandal's name from the list of celebrities.
टिप्पणी पोस्ट करा