उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणाचे बीड कनेक्शन, तिघांना अटक



● मागच्या आठ ते दहा दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणाचे कनेक्शन बीडपर्यंत येऊन पोहचले आहे. 

● कारण या प्रकरणातील एक आरोपी बीड येथील रहिवासी असून तो केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी असल्याचे समोर येत आहे.

अहमदनगर येथील श्रवण यंत्राची किमत आपणास कदाचित चकित करून जाईल.

● इरफान शेख (रा.बीड) असे पोलिसांनी अटक केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आले होते. 

● त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला. मागच्या काही दिवसांपुर्वीच या प्रकरणात केंद्रीय मंत्रालयात काम करणार्‍या एका अधिकार्‍यालाही गजाआड केले होते. 

● आता या प्रकरणाचे कनेक्शन थेट बीडपर्यंत येऊन पोहचल्याचे समोर येत आहे. कारण सोमवारी या प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे.

● यामध्ये गुरगाव (उत्तर प्रदेश) मन्नू यादव तसेच दिल्ली येथील राहुल भोला आणि बीड येथील इरफान शेख या तिघांचा समावेश आहे. 

● इरफान शेख हा केंद्रीय मंत्रालयात महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी असल्याचे समोर येत आहे.