बीडमध्ये पहिलेच आदेश कायम !



● जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सात टक्यांच्या घरात असून ऑक्सिजन बेडची संख्या देखील 11 टक्यांपेक्षा अधिक आहे.

● त्यामुळे बीड जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून पूर्वीचेच आदेश कायम राहतील असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी म्हटले आहे. 

● राज्य शासनाने 5 जून पासून अनलॉक ची प्रक्रिया पाच टप्यात सुरू केली आहे .बीड जिल्हा हा तिसऱ्या टप्यात आहे. कारण पाच टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट आहे,त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार पासून सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू राहतील .

● बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा पॉझिटिव्हीटी रेट 7.11 टक्के असून ऑक्सिजन बेडची संख्या 11.97 टक्के इतकी आहे. 

● त्यामुळे किराणा आणि मेडिकल वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील .तर शनिवारी आणि रविवारी ही दुकाने बंद राहतील .