मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आ. सुरेश धस यांचा धडक मोर्चा...



मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसह बीड जिल्ह्यातील इतर मागण्यांसाठी आज भाजपचे विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांनी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.

बीड शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून या धडक मोर्चाला सुरुवात होत असून त्यानंतर हा मोर्चा शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला..

यावेळी व्यासपीठावरून बोलताना सुरेश धस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निवडताना गर्दी जमते राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिसंवाद यात्रा आयोजन केले जातात. 

शिवसेनेचे कार्यक्रम सुद्धा जोरदार सुरू आहेत. मात्र, आम्ही मोर्चा काढला की, कोरोनाचे कारण आम्हाला पुढे करतात, अशी टीकासुद्धा यावेळी त्यांनी केली आहे.