धनंजय मुंडे साहेबानी केले असे काही काम - बीड जिल्हात गुन्हेगारी....
बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना साधनांची कमतरता असल्यामुळे गुन्हा घडल्याच्या ठिकाणी तात्काळ पोहचता येत नव्हते, ही बाब ध्यानी घेऊन पोलिस दलाला साधनं देण्याचा निर्णय घेण्यात आला. या साधनांच्या सहाय्याने पोलीस दलाने अशी कामगिरी करावी की, जिल्ह्यामध्ये इथून पुढे कुणीच गुन्हा करण्याची हिम्मत करू नये आणि राज्यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचवावी, असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
या वेळी जिल्हा नियोजन समितीमधून बीड जिल्हा पोलीस दलाला १५१ दुचाकी आणि ९ चारचाकी वाहने आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री मुंडे बोलत होते. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी केल्यानंतर पालकमंत्री मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोलीस दलाकडे वाहने नसल्याची बाब समोर आली. बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. गुन्ह्याचा तपास करताना आणि गुन्हा घडला त्या ठिकाणी पोलीसांना साधनाअभावी लवकर पोहचता येत नव्हते.
टिप्पणी पोस्ट करा