पावसामुळे बीडचे बसस्थानक बनले गटार

 

बीड शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून दररोज हजारो लोक बसने शहरात येतात आणि जातात. 

परंतु बीडच्या बसस्थानकाला गटरीचे स्वरुप आल्याने  येणाऱ्या प्रवाशाला गाडीतून उतारल्याबरोबर अगोदर घाणीतून मार्ग काढत चालावे लागत आहे. 

पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असून बीड शहरात थोडा जरी पाऊस झाला तरी , बसस्थानकात घाण पाण्याचे मोठ-मोठे डबके साठतात. 

त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. एवढेच नाहीतर या डबक्यात साठलेल्या घाण पाणी  व दुर्गंधीयुक्त चिखलामुळे प्रवाशाना गाडीत चढतांना आणि उतरल्यावर चालतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.  

त्यामुळे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बीडच्या बस स्थानकातील घाणीचे साम्राज्य नाहीसे करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.