पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध



राज्यात कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात खबरदारी घेत नवे नियम जाहीर केले आहेत. सोमवार दि. 28 जूनपासून पुणे शहरात मनपा हद्दीत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

◆ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

◆ अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

◆  मॉल, सिनेमागृह नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.



◆  रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमते सुरु राहतील. दुपारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील.

◆ लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

◆  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.

◆  सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

◆ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 

◆ शासकीय कार्यालये ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

◆ सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.

◆ सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील.

◆ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.

◆ लग्र समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

◆ अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीस परवानगी राहील.