अर्थमंत्र्यांकडून कोव्हिडग्रस्त भागांसाठी मोठ्या योजनेची घोषणा
● केंद्र सरकारने कोरोना संकटात दिलासा देणाऱ्या आणखी काही योजना नव्यानं जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य, पर्यटन, शेती अशा वेगवेगळ्या घटकांसाठी योजनांची घोषणा केली.
● कोव्हिडग्रस्त भागांसाठी १ लाख १ कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची (कर्ज हमी) घोषणा करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार आहे.
● पर्यटनासाठी देखील योजना जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ववत झाल्यानंतर भारतात येणाऱ्या पहिल्या 5 लाख परदेशी व्यक्तींना व्हिसासाठीचं शुल्क द्यावं लागणार नाही. ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना लागू असेल. एका परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल.
● देशातील सगळ्या ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी १९ हजार ४१ कोटी रुपये अधिक देण्याची घोषणाही सीतारामण यांनी केली. तर खतांसाठी जे ८५ हजार ४१३ कोटी रुपयांचं अनुदान दिलं, त्यात १४ हजार ७७५ कोटी रुपयांचं अधिक अनुदान जाहीर करण्यात आलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा