परळीत MIDC येणार धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश
परळीतील तरुणांना मिळणार रोजगार संधी उपलब्ध व्हावी, उद्योगधंदे येऊन संपूर्ण भागाचा विकास होण्याकरिता परळीचे आमदार विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या परळी, सिरसाळा येथील MIDC च्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाकडून अखेर मान्यता मिळाली.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. परळीसाठी हि अत्यंत आनंदाची बातमीपासून परळीसोबतच नजीकच्या तालुक्यांना आणि बीड जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. नवनवीन उद्योग आपल्या राज्यात आणून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे राज्याचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या निर्णयामुळे नक्कीच परळीला एक औद्योगिक ओळख पण लवकरच प्राप्त होणार आहे.
परळी येथील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी परळीत MIDC सुरू व्हावी असा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री @dhananjay_munde यांनी मांडला होता. त्या प्रस्तावास सरकारकडून मान्यता मिळाली आहे. लवकरच परळीतील सिरसाळा येथे MIDCची उभारणी करण्यात येईल. pic.twitter.com/4zFbc03XFY
— Subhash Desai (@Subhash_Desai) June 13, 2021
टिप्पणी पोस्ट करा