कोरोनाने होमगार्डचा मृत्यू बीड ग्रामीण पोलिसांनी माणुसकी दाखवत केली लाख मोलाची मदत


पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी होमगार्ड रात्रंदिवस कर्तव्य बजावतात. पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना शासन ५० लाखांची मदत देतं मात्र होमगार्डांना कसलाच विमा मिळत नाही.

बीड जिल्ह्यातील दोन होमगार्ड कर्तव्यावर असताना कोरोनाने मृत्यू पावले आहेत. त्यात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कुंभारकर नावाचा एक होमगार्ड मृत्यू पावला असून त्यांच्या कुटुंबियांना बीड ग्रामीण पोलिसांनी लाख मोलाची मदत केली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस रस्त्यावर उतरत आहे. कोरोना काळात डयुटी बजावत असताना ज्या पोलीस कर्मचार्‍याला कोरोना झाला त्याला उपचारासाठी आणि मृत्यू झाला तर शासन विम्यापोटी ५० लाखांची मदत करतात. 

मात्र त्यांच्याच खांद्याला खांदा लावून होमगार्ड आपले कर्तव्य बजावतात. कर्तव्य बजावताना त्यांच्या एक पाऊल पुढे होमगार्ड असतात. मात्र शासनाने होमगार्डांना विमा कवच दिले नसल्याने बीड जिल्ह्यातील शेकडो होमगार्ड विना विमा कवच कोरोना ड्युटी बजावतात. 


वाचकहो, 'ILOVEBEED'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @ilovebeed ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!