OBC आरक्षण प्रश्नी राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन



ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. 



राज्यातील ठिकठिकाणच्या आंदोलनाचा एकत्रित आढावा

बीड : खासदार पितम मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहरातील इटके कॉर्नर रस्त्यावर चक्काजाम आंदोलनाला सुरुवात 

औरंगाबाद : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपकडून आज औरंगाबाद -जालना रोडवरील आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

धुळे : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

नाशिक : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलनास सुरुवात