राहाता तालुक्यात पती-पत्नीचा निर्घृण खून
● राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय ६०) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय ५५) या पती-पत्नीचा निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे.
● शशिकांत चांगले आणि सिंधुबाई हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असून कालच हे दोघे आपल्या मुलांना भेटून घरी आले.
● सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती-पत्नी आज का लवकर उठले नाही, म्हणून शेजाऱ्यांनी घरी जाऊन पहिले. त्यावेळी दोघेही मृतावस्थेत होते आणि त्यांच्या डोक्याजवळ फावडे रक्तानी भरलेले होते. हे पहिल्यानंतर स्थानिकांनी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.
● अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे आणि पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्यासह राहाता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
टिप्पणी पोस्ट करा