राज्यातील 'या' जिल्हयांना अलर्ट; पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

 


● राज्यात शेतकरी गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाकडे डोळे लावून बसले होते. मात्र आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यात पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

● या पार्श्वभूमीवर आज पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

●  दरम्यान, मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

● दरम्यान २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट जारे करण्यात आला आहे.