PUBG Mobile गेममध्ये आता दिसणार टेस्लाच्या कार



● जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या कार आता तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला ऑनलाईन बॅटल गेम PUBG Mobile मध्येही दिसणार आहेत. 

● PUBG Mobile इंडिया गेम गेल्या वर्षी भारतात बॅन झाला, पण हा गेम काही दिवसांपूर्वीच Battlegrounds Mobile India या भारतीय व्हर्जनमध्ये पुन्हा आलाय. 

● मात्र, Krafton आणि Tencent ची भागीदारी असलेल्या मूळ पबजी गेमची लोकप्रियता अन्य देशांमध्ये अजूनही कायम आहे. 

● या गेममध्ये कंपनी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स आणत असते. आता कंपनीने एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लासोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.

● टेस्लासोबत झालेल्या भागीदारीमुळे आता PUBG Mobile खेळणाऱ्यांना लवकरच गेममध्ये टेस्लाच्या कारची मजा घेता येणार आहे. 

● शिवाय टेस्लाचे अन्य काही प्रोडक्ट्स देखील गेममध्ये बघायला मिळतील, याबाबतची माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे.