चोरट्यांनी धाक दाखवून पोलिसाला लुटले
नाशिकहून लातूरकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कार अडवून चोरट्यांनी धाक दाखवून नगदी 21 हजार रुपये, दागिने
असा 93 हजार 400 रुपरांचा ऐवज लुटून नेल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी (ता. केज) फाट्या जवळ घडली.
या प्रकरणी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लातूर जिल्ह्यातील सलगरा बु. येथील प्रदीप अशोक कांबळे (वर 36) हे नाशिक पोलीस दलात नोकरीस आहेत.
14 मे रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांची कार केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी ( ता. केज ) फाट्याच्या जवळ आली असता चार चोरटे अचानक कारसमोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबले.
चोरट्यांनी कारची चावी काढून घेत लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 21 हजार रुपरांची रोकड,
सोन–चांदीचे दागिने असा 93 हजार 400 रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा