💊 आजच्या शॉर्ट बातम्या

[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://chat.whatsapp.com/LbK2hdmE2SGBT2xt5oKEqR ]

कोरोनावर '2-DG' औषध ठरणार रामबाण, 'डीआरडीओ'ची निर्मिती 

😷 कोरोनावर अजूनही ठोस औषध सापडलेले नाही. त्यामुळे सध्या तरी प्रतिकारशक्ती वाढविणे आणि या आजारापासून स्वतःचा बचाव करणे, हाच एक पर्याय आहे. कोरोना व्हायरस शरीरात गेला, की तो आणखी व्हायरसची निर्मिती करतो. ते रोखण्याचं काम आता 'डीआरडीओ'च्या '2 -DG' हे औषध करणार आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎲  ऐकू कमी येतं? 

📱 मग खलील लिंक क्लिक करून वाचा: 👉https://bit.ly/3foGs55

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏥 भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस'च्या टीमने पावडरच्या स्वरुपात '2-DG' औषधाची निर्मिती केली. त्यात हैदराबादमधील 'डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी'च्या संशोधकांची भू्मिकाही महत्त्वाची राहिली.


🩺 कोरोनाची पहिली लाट आली, त्यावेळी म्हणजे, गेल्या वर्षीच या औषधावर काम सुरु झालं होतं. मे-2020 मध्ये 'डीसीजीआय'ने परवानगी दिल्यावर ऑक्टोबरपर्यंत या औषधाची ट्रायल सुरु होती. त्यात हे औषध रुग्णांसाठी सुरक्षित व प्रभावी असल्याचं समोर आलं. त्यानंतर 'डीसीजीआय'ने नोव्हेंबर-2020 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली. शेवटी 9 मे 2021 रोजी 'डीसीजीआय'ने या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली.


🩸 '2-DG' औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासते. सध्या या औषधाचा 'सेकंडरी मेडिसिन'प्रमाणे वापर करण्यास परवानगी दिली आहे. बऱ्याच प्रमाणात हे औषध 'ग्लुकोज'सारखं आहे. कोरोना व्हायरसला शरीरात रोखण्याचं काम हे औषध करते. त्यामुळे त्यास 'अँटि कोविड ड्रग' असही म्हटलं जात आहे.


💉 10 हजार डोस तयार

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी '2-DG'च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली. लवकरच हे औषध रुग्णांना दिले जाणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉ilovebeed.com