भारतात तुर्तास मास्कविना वावरता येणार नाही- डॉ.रणदीप गुलेरिया
● देशात कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू आहे. मात्र अद्याप देखील मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झालेले नाही.
● तर दुसरीकडे कोरोना लस घेतल्यानंतर देखील सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे या कोरोना नियमांचे पालन करावं लागत आहे.
● अमेरिकेत मात्र लस घेतलेल्या नागरिकांनी मास उतरवले आहेत सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रेव्हेंशनच्या सल्ल्याने अमेरिकेने मोकळा श्वास घेतला आहे.
● तर भारतात लस घेतलेले नागरिक मास्कविना फिरू शकत नाही का असा सवाल केला जात असताना एम्स चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्टीकरण आहे.
● गुलेरीया यांनी सांगितलं सध्या भारतातील वातावरण अमेरिकेप्रमाणे नाही. तर भारतात कोरोना लस नवीन विषाणूवर परिणाम कारक असल्याचे अद्याप अनिश्चित आहे. असे देखील त्यांनी म्हटले.
टिप्पणी पोस्ट करा