कोणता मास्क कुठे? कधी? कोणी वापरावा? WHOने दिल्या गाईडलान्स



● कोरोना आजाराचा उद्रेक होऊन डिड वर्षांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या हातात आहे ते मास्क आणि सॅनिटायझर चा वापर.    

● या मास्क मध्ये वेगवेगळे प्रकार असून कोणता मास्क कुठे? कधी? कोणी वापरावा? WHOने गाईडलान्स जरी केल्या आहेत. 

● सर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क सोबतच आता डबल मास्क बाबत अनेक मतं तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. 

● जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने एक ट्वीट करून सर्जिकल मास्क आण फॅब्रिक मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

● आरोग्य कर्मचारी, कोव्हिड19चे लक्षणं असलेले रुग्णांची देखभाल करणाऱ्या लोकांनी सर्जिकल मास्क वापरावा. 

● जेथे 1 मीटर सोशलडिस्टंन्सिंगचे पालन करणे शक्य नसेल तेथे सर्जिकल मास्क वापरावा. 

● ज्यांना कोव्हिड19चे लक्षणं नाहीत. किंवा संसर्ग नाही त्यांनी फॅब्रिक मास्क वापरावा. 

● सार्वजनिक वाहतूक, ऑफिस, भाजीपाला आणि इतर गर्दीच्या ठिकाणी फॅब्रिक मास्क वापरावा.

● एअरपोर्ट, ट्रेन, बस अशा ठिकाणी जा-ये करीत असाल तर डबल मास्क वापरावा. तर सर्जिकल मास्कच्या वर कपड्याचा मास्क किंवा N95 मास्कचा वापर केला तर डबल मास्कची गरज पडत नाही.