जिओच्या स्पीडला प्रॉब्लेम; बदला ‘या’ सेटिंग!
आजही काही युजर्स जिओच्या स्पीडवर संतुष्ट नाही आहेत. युजर्सना कॉलिंग आणि इंटरनेट स्पीडचा त्रास सहन करावा लागत आहे. यामागे कारण तुमच्या मोबाईलची सेटींग सुद्धा असू शकते. आज आपण अशा सेटिंगविषयी पाहुयात, ज्यामुळे तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड आणखी वाढेल. ही सेटिंग अत्यंत सोपी असून, कोणीही सेट करू शकतो.
1) तुम्ही APN सेटिंग बदलून तुम्ही तुमच्या जिआचा 4G स्पीड वाढवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे मोबाईल नेटवर्कचे ऑप्शन असेल. यात प्रिफर्ड नेटवर्क टाईपला LET मध्ये सेट करा.
2) आता पुन्हा मोबाईल सेटिंगमध्ये जा आणि Access Point Names निवडा. यावर क्लिक केल्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील. यातील APN प्रोटोकॉलचे ऑप्शन निवडा. याला Ipv4/Ipv6 करा.
3) आता इथेच Bearer चे ऑप्शन दिसेल. यामध्ये LET निवडा.
4) अॅण्ड्राईड सिस्टम रॅन्डमली काही फाईल्सचा वापर करते आणि त्या सेव्ह करत असते. या फाईल्सला Cache फाईल्स म्हणतात. या फाईल्स डिलिट करून तुम्ही मोबाईलचा स्पीड वाढवू शकता.
टिप्पणी पोस्ट करा