बीडच्या ताज्या बातम्या आजच्या परळीचा प्लांट अंबाजोगाईमध्ये कार्यान्वित !
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट आज कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्लांट द्वारे दर दिवसाला 288 जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन हवेतून वेगळा करून निर्माण होणार असून याद्वारे रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या 40% ऑक्सिजन निर्माण होणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
ना. धनंजय मुंडे यांच्यासह ऊर्जा राज्य मंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते एका व्हीडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांसह आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा