धनंजय-पंकजा मुंडे नवं ट्वीट चर्चेत



राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर युद्ध सुरु झाल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या उत्तरांवर पंकजा यांनी पुन्हा पलटवार केला आहे.

बाजोगाईत - ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पंकजा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यातील करोना परिस्थितीकडं लक्ष देण्याची विनंती केली होती. तसंच, धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. पंकजा यांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या ट्वीटवर उत्तर दिलं आहे.

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, असं धनंजय मुंडे यांनी लिहलं होतं. त्यानंतर हाच धागा पकडत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

जेनेलियाने बोलती बंद, तिच्यापुढे रितेशने चक्क हात जोडले

'राज्याच्या भल्यासाठी पंतप्रधान, जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना ही पत्र लिहिन दखल ही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास, निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा. उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ,' असं पंकजा यांनी म्हटलं आहे.