खा. विखे अडचणीत; रेमडेसिवीर वाहतुकीचे फुटेज जप्तीचा आदेश



खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीतून हवाईमार्गे आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळेेे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल सुनावणी झाली.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी खा.डॉ. सुजय विखे यांना पाठीशी घातल असल्याचे निरीक्षण न्या.आर.व्ही.घुगे व न्या. बी.यू. देबडवार यांनी नोंदविले. 

यांची याचिका : 

अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिंक्य काळे तर शासनातर्फे अ‍ॅड.डी.आर.काळे काम पाहात आहेत.


फुटेज जप्तीचा आदेश:

शिर्डी विमानतळावरील 10 ते 25 एप्रिल दरम्यानचे मालवाहतुकीचे सर्व फुटेज व नोंदी जप्तीचा आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 


सरकारी वकिलांचा अहवाल : 

अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांनी सरकारी वकिलांमार्फत 28 एप्रिल 2021 चा अहवाल न्यायालयात सादर केला. जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने नगर जिल्हा शल्यचिकित्सकांनी विखे मेडिकल स्टोअरला मिळालेल्या पैशातून पुणे येथील फार्माडी कंपनीकडून रेमडेसिवीर खरेदी केली. 


जिल्हाधिकाऱ्यांबाबत निरीक्षण :

त्यातील काही साठा जिल्हा शल्यचिकित्सकांंनी विखे मेडिकल स्टोअर दिला. हा साठा 1700 रेमडेसिवीर इंजेक्शनचा होता.‍ जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केलेला साठा दिल्ली येथून शिर्डी येथे आलेला नव्हता. 

त्यावरून नगर जिल्हाधिकारी खासदार विखे यांना पाठीशी घालत आहेत, असे गंभीर निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.