कोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो का?



कोरोनाची लस टोचल्यावरही कोरोनाची बाधा झाल्याची काही निवडक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे लसीकरणाचा खरच फायदा होतो का? याबाबत आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. 


लसीकरणाचा फायदा होतो का?

● कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी लस उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. 

● लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर त्यामुळे रुग्ण क्रिटिकल अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळपास नसल्यात जमा आहे. 

● लसीकरणामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर हॉस्पिटलायझेशन सुद्धा कमी होणार आहे. 

● मागील दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लसी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे.

● आपल्या देशातही पाहणीत हे आढळून आले आहे की, लसीकरणानंतर त्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता कमी झाली आहे.

● तर लसीमुळे अधिक जास्त, अधिक प्रभावी, अचूक आणि दीर्घकाळपर्यंत टिकून राहील, अशी रोगप्रतिकारशक्ती आपल्याला मिळते. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा फायदा होतो.


लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का? : 

● लशीची पहिली मात्रा शरिरात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्र तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. 

● काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली तर दुसऱ्या मात्रेने ती भरून निघते. 

● तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात.