या तारखेनंतर येणार किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता, असे चेक करा आपले नाव



पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची दीर्घ काळापासून प्रतिक्षा आहे. मागील वर्षी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 वा हप्ता जाहीर केला. तेव्हापासून शेतकरी आठव्या हप्त्यासाठी 2000 हजार रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. 

मे महिन्यात कोणत्याही दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी चर्चा आहे. 

यावेळी फसवणूक करुन या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. आपण आपले नाव सूचीमध्ये तपासू शकता.


असे चेक करा स्टेटस

– आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी (pmkisan.gov.in) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

– येथे उजव्या बाजूला एक फार्मर्स कॉर्नर आहे. तिसर्‍या क्रमांकावर लाभार्थी स्थितीचा कॉर्नर आहे.

– लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यास एक विंडो ओपन होईल.

– त्यामध्ये आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबरची माहिती प्रविष्ट करा आणि गेट डेटावर क्लिक करा.

– गेट डेटा क्लिक केल्याने शेतकऱ्याशी संबंधित सर्व माहिती ओपन होईल. आतापर्यंत किती हप्ता पाठविला गेला आहे व कोणत्या तारखेला आहे याची यादी तिथे नोंदविली गेली आहे.

– आता आपल्याला आगामी हप्त्याचा कॉलम पहावा लागेल. यामध्ये वेटिंग फॉर अप्रूवल बाई स्टेट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता प्रतीक्षा करावी लागेल. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.

– आएफटी साईन्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा डेटा तपासला गेला आहे.

– एएफटीओ इज जनरेटेड अँड पेमेंट कंन्फर्मेशन इज पेंडिंग असे लिहिले असेल तर याचा अर्थ आपल्याला आपल्या खात्यात लवकरच पैसे मिळू शकतात.