औरंगाबाद - रुग्ण संख्या घटल्याने शहरातील पाच कोविड सेंटर रिकामे



फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यावेळी बंद झालेली कोविड सेंटर सुरु करण्यात आली. 10 कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र तेही पुरे'णासे झाल्यामुळे महापालिकेने आणखी 11 कोविड सेंटर (Covid19 Centre) सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यातील आठ सेंटर लगोलग सुरु झाले. त्याचबरोबर शहरातील मंगल कार्यालयांची पाहणी करत मंगल कार्यालय चालकांना ते ताब्यात घेण्यासाठी पत्र देखील देण्यात आले. (Five covid centres in the city evacuated as Aurangabad patient numbers fall)

आयडिया सेंटर (Idea Centre) मोठमोठ्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील रुग्ण संख्या निम्म्यावरच आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. सध्यस्थितीत शहरात एकुण 18 कोविड सेंटर असून यातील पाच ठिकाणी शून्यावर रुग्ण संख्या आहे. शहरात एकूण 3 हजार 689 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील 2 हजार 45 बेड रिकामे असून 1 हजार 644 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

विद्यापिठातील रमाई, छत्रपती, संत तुकाराम, देवगिरी गर्ल्स हॉस्टेल आणि पीईएस अभियांत्रिकी या पाच कोविड सेंटरवर सध्या एकही रुग्ण नाही.