मुतखड्याची समस्या आहे? मग ‘हे’ पदार्थ टाळा!
जर, तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ नये, असे वाटत असेल तर काय सेवन करावे आणि काय टाळावे? याबाबत गंभीर असणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी तुमच्यासाठी कामी येतील.
● पालक : मूत्रपिंडात खड्यांची समस्या असल्यास पालक खाणे टाळले पाहिजेत. यामागचे कारण असे आहे की, पालकात ऑक्सलेट असतो जो रक्तात असलेल्या कॅल्शियमशी स्वतःला सांधतो आणि मूत्रपिंड ते फिल्टर करू शकत नाहीत.
● ऑक्सलेटयुक्त अन्न :किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल, तर डॉक्टर पेशंटला ऑक्सलेट युक्त वस्तू अजिबात खाऊ नका किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. उदा. बीटरुट, भेंडी, रास्पबेरी, रताळे, चहा, नट, चॉकलेट
● चिकन, मासे, अंडी : लाल मांस, कोंबडी, पोल्ट्री प्रोडक्ट, मासे आणि अंडी हे असे काही पदार्थ आहेत, ज्यात Animal Protein जास्त प्रमाणात असतात. आणि या गोष्टींच्या अति सेवनाने शरीरात यूरिक आम्लाचे उत्पादन जास्त होते. म्हणून हे टाळा.
● मीठ : यात सोडियम असते आणि हे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रात कॅल्शियम तयार होण्यास सुरुवात होते. म्हणून अन्नात जास्त मीठ घालणे टाळा.
● कोला किंवा सॉफ्ट ड्रिंक : कोलामध्ये फॉस्फेट नावाचे एक केमिकल आहे, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होण्याची शक्यता असते. म्हणून, प्रक्रिया केलेले अन्न आणि पेय जास्त प्रमाणात पिऊ नका.
टिप्पणी पोस्ट करा