कुठं जायाचं? कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip



पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan) प्रकरणातआणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यापूर्वी ज्या ऑडिओ क्लिप आल्या त्यातल्या सर्वच्या सर्व क्लिप आम्ही आपल्याला ऐकवल्या आहेत आणि त्याचं शब्दांकनही केलेलं आहे. आता पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, गबरुशेठ कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गबरुशेठविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.  (Pooja Chavan And Gabaru Sheth Audio Clip )


पूजा चव्हाण गबरुशेठमध्ये मंबई-पुणे ते कुलू मनाली जम्मू काश्मीर पर्यंतची चर्चा

गबरुशेठ आणि पूजा चव्हाण यांच्यातील 3 मिनिटे 57 सेकंदाच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे. या क्लिपमध्ये गबरुशेठ आणि पूजा यांच्या फोननंबर रिजेक्ट लिस्टमधून काढणे, कुलू मनाली,जम्मू काश्मीरला फिरायला जाण्याबद्दल चर्चा झाल्याचा संवाद आहे. मुंबई, पुणे येथे फिरण्यावरुनही या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद ऐकायला मिळतो. पूजा आणि गबरुशेठ यांच्यातील संभाषण सुरु असताना ती एका इमारतीच्या गच्चीवर उभी असल्याचं स्पष्ट होते.


ऑडिओ किल्पमधील संवाद

गबरुशेठ – हॅलो


पूजा चव्हाण – आपका हुकूम सर आँखों पर..रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय.


गबरुशेठ – हाहाहाहाहा…क्या बात है..थँक्यू थँक्यू..


पूजा चव्हाण – मी काढणार नव्हते महिनाभर तरी, मात्र तुमच्या शब्दापुढे जाता येत नाही.


गबरुशेठ – असं का…?


पूजा चव्हाण – विचारा किती दिवसांपासून…आठ दिवस झाले….अजून महिनाभर ठेवणार होते.


गबरुशेठ – वेटिंगवर टाका वेटिंग…मग बाकी…


ऑडिओ क्लिपच्या पहिल्या टप्प्यात पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यात फोननंबर रिजेक्ट लिस्टमधून काढण्याबद्दल चर्चा होते. यामध्ये पूजानं एका व्यक्तीचा फोननंबर रिजेक्ट लिस्टमध्ये आठ दिवस टाकला असल्याचं स्पष्ट होते.


पूजा चव्हाण – बाकी काय…हाय की आता तुमचं…काय करावं…इलाज नाही..


गबरुशेठ – कवा जायचं आपल्याला…


पूजा चव्हाण – मुंबईला, पुणे ?


गबरुशेठ – कुठंही जाऊ काय त्यात?


पूजा चव्हाण – बघा…आं…


गबरुशेठ – यस्स्स….


पूजा चव्हाण – कुलू मनालीला…आणि जम्मू काश्मीरला जाऊ…


गबरुशेठ – 100 टक्के जाऊ…


पूजा चव्हाण – बघा बघा रं…


गबरुशेठ – होय..


पूजा चव्हाण – लवकर वापस या..मग..


गबरुशेठ – ठीकय…


पूजा चव्हाण – लगेच निघा…काम झाल्या झाल्या…मग जाऊयात…


गबरुशेठ – बरं…


पूजा चव्हाण – पुणे, मुंबई बस झालं आता…