सगळ्यांंना सत्तेची पडलीय आणि मनसेला जनतेची, असं का?



 2009 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थापनेनंतरचं अभूतपूर्व यश मिळवलं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपसारखे मातबर आणि प्रस्थापित पक्ष असतानासुद्धा मनसेने या सर्वांना दिलेला तो धक्काच होता. आता हे असं का झालं? तर महाराष्ट्रात दोन राष्ट्रीय आणि दोन प्रादेशिक पक्ष असतानासुद्धा सर्वसामान्य मराठी माणसाच्या आशाआकांक्षा पुर्ण करण्यात एकही पक्ष यशस्वी झाला नाही म्हणून जनतेने आपला स्वतःचा पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडलं होतं.

2014 नंतर आपण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सत्तेसाठीचा जो तमाशा बघितला तो अतिशय निंदणीय आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजप या चारही पक्षांनी वेळोवेळी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद अशा सत्ताकेंद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपला पक्ष आणि आपल्या विचारधारेशी तडजोड केल्याचं अवघ्या महाराष्ट्राने बघितलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजवरच्या वाटचालीत आपली बांधीलकी नेहमी मराठी माणसासाठी ठेवली, सत्तेशी नाही हे संपूर्ण महाराष्ट्र मान्य करतो.

पण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या या मोठ्या वाटचालीत आपली बांधीलकी ही जनतेशी आणि ईथल्या मराठी माणसासाठी आहे हे नेहमीच दाखवून दिलं आहे. मराठी अस्मिता, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हीच आपली विचारसरणी असल्याचे मनसेच्या अनेक भूमिकांमधून आपल्याला कळाले आहे.

महाराष्ट्रात नेहमी खराब रस्त्यांचा विषय हा कळीचा मुद्दा राहीला आहे. जेव्हा रस्ते खराब असताना सर्वसामान्य मराठी माणसांनी असल्या खराब रस्त्यांचा कर कशाला भरायचा? अशी भूमिका घेत ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ या महाराष्ट्राला अपरिचित आंदोलनाला हाक दिली आणि याचा परिणाम काय झाला, आणि किती असले बोगस आणि जनतेची लूट करणारे टोल मनसेनं बंद पाडले हे महाराष्ट्र जाणतो.

अगदी मुंबईत नेहमीच मराठी माणूस शिल्लक नाही वगैरे वगैरे अशी ओरड करणारी शिवसेना मागचा बराच काळ मुंबई महापालिकेत सत्तेत असूनही मराठी माणसांचे प्रश्न सोडवू शकलेली नाही. फक्त मतांसाठी ओरड करताना अशा या सर्व पक्षांनी मराठी माणसाच्या माथी नेहमी फक्त निराशाच मारली आहे. मुंबईतील नाईजेरीन टोळ्या, मत्स्यव्यवसायातील भैय्येगीरी, बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांचं असणं यावर मनसेने फक्त बोलून तोडाची वाफ घालवली नाही तर ग्राऊंड लेवलवर जाऊन मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी भूमिका पार पाडली आहे. अगदी आता अलीकडचेच म्हणायचे तर ‘शोभा देशपांडे’ प्रकरणात मनसे नेते संदीप देशपांडेंची भूमिका अभिमानास्पद आहे.

आपल्या समाजात नेहमीच अनेक राजकीय पक्षांनी, शक्तींनी काम केलंय. पण भूमिपुत्रांचा सिद्धांत मानणार्या महाराष्ट्रातील मराठी माणसाची नेहमीच निराशा झाली कारण या अशा अनेक घोषणांवर आणि बोगस आश्वासनांवर ईथे राजकीय पक्षांनी जनतेला भूलीस पाडलं. पण हे खूप दिवस असं चालणार नाही.