ती वयात येताना.... | Blog Post by Snehali kul

ती वयात येताना.... | Blog Post by Snehali kul


तिला आता स्वतःचाच राग येऊ लागला..का लोक एवढ्या घाणेरड्या नजरेने बघतात आपल्याकडे..तिच्या मनात न्यूनगंड वाढत जात होता..आणि अगदी आत्मविश्वासु असलेली ती बदलू लागली.. तस बघायला गेलं तर फक्त ६वी मध्ये शिकत होती, पण अचानक झालेल्या शारीरिक बदलांमुळे आणि घडत जाणाऱ्या घटनांमुळे ती पुरती कोलमडून जात होती. या गोष्टी घरात देखील सांगायची भीती तिला वाटत होती. मग स्वतःच एकटी रडणं, आणि तिरस्कार करून स्वतःला दोष देणं तिने सुरू केलं..ती नुकतीच वयात आली होती आणि शरीराने अत्यंत आकर्षक दिसत होती. त्यामुळे नको त्या अवयवांवर लोकांच्या खिळनाऱ्या नजरा तिला अधिकच परेशान करत होत्या, त्यातच तिच्यासोबत अशा काही घटना घडल्या त्यामुळे ती संपूर्णपणे बदलून गेली. ज्या रिक्षमध्ये ती शाळेत जायची त्यात आधी सुरुवातीला रिक्षावाल्या काकांच्या बाजूला पुढे बसण्यासाठी सारे भांडायचे..पण अचानक काका रोजच हिला समोर बसवू लागले आणि टर्न घेताना हात बाहेर काढायचा बहाण्याने तिला समोरून जोरात दाबू लागले..हळूहळू हा प्रकार वाढतच जाऊ लागला तिने मग वेगवेगळ्या बहाण्याने पुढे बसणेच टाळले..एवढे कमी होते त्यात भर म्हणून पुन्हा एक विचित्र प्रकार तिच्यासोबत घडला..एकदा रोजप्रमाने मैत्रिणी कडे अभ्यासासाठी गेली असताना तिच्या अत्यंत जिवलग मैत्रिणी च्याच घरात तिच्याच वडिलांनी घरात कोणी नसतांना हिला आत बोलावले आणि खूप घाणेरड्या पद्धतीने तिच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवला..

ही खूप घाबरली आणि तिथून पळून आली..एकत्यात जाऊन खूप रडली.पण ही गोष्ट सांगणार कोणाला म्हणून पुन्हा शांत बसली..एकदा घरातून समान आणायला बाहेर गेली तेव्हा तिला लक्षात आल की आपला कोणीतरी सतत पाठलाग करत आहे..ती घाबरली पूर्णपणे घामेघुम झाली आणि रडायचं घरी आली तिने तिच्या वडिलांना हे सांगितले तर वडील हीच्यावराच चिडले..कोणी सांगितलं बाहेर फिरायला म्हणून हीलाच ओरडले..तसेच त्या माणसालाही जाऊन झापून आले..त्यानंतर त्याने कधी हीचा पाठलाग केला नाही..मात्र तिच्या मानसिक स्थिती वर खूप परिणाम झाला..घरात तिची चिडचिड वाढली..ती खूप आक्रमक होऊ लागली. माणूस हा वाईटच असतो अशी तिची धारणा झाली..आली तिने त्यांच्याकडे तुच्छतेने बघू लागली..जवळ येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे संशयाच्या नजरेने बघू लागली..आणि काही दिवसातच ती पुन्हा बदलली.मुलांसारखे वागणे,बोलणे,चालणे,कपडे घालणं तिने सुरू केले.तिच्या वागण्यात बोलण्यात आत्मविश्वास आला, तिच्याच नाही तर तिच्या मैत्रिणींच्या वाटेला जाणाऱ्या लोकांना देखील ती आता धडा शिकवू लागली..

हा बदल जरी सकारात्मक होता तरी घडलेल्या गोष्टी तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून गेल्या होत्या... आजही अशा अनेक गोष्टी नव्याने वयात येणाऱ्या मुलींसोबत घडत असतात..काही त्यांच्या काळात तर काही त्यांच्या नकळत..याने त्यांचे बालपण त्यांच्याकडून हिरावून घेतले जाते..त्यांची मनस्थिती खूप बदलते..काही जनिंवर याचा खूप नकारात्मक परिणाम होतो..अशावेळी पालकांनी आपल्या मुलींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून नव्याने वयात येणाऱ्या मुलींना विश्वासात घेऊन ,त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नात निर्माण करून त्यांना समजून घ्यायला हव..त्यांना आधीच या गोष्टींची कल्पना देऊन, प्रतिकार करायचे बळ देखील द्यायला हव..आज परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे..लोकांची विकृती वाढत जात आहे..आपल्या मुलीला या कुठल्याही गोष्टीला सामोरे जावे लागू नये किंवा लागलेच तर त्यासाठी योग्य रीतीने तयार करणे हे आपल्याच हातात आहे..