हे व्यवसाय कधीही बंद पडणार नाहीत - These businesses will never close

हे  व्यवसाय कधीही बंद पडणार नाहीत


 मित्रांनो मला बरेच लोक कमेंटमध्ये विचारत असतात की, सर आम्हाला व्यवसाया संबंधात कल्पना सुचवा. आम्हाला कोणता व्यवसाय करायचा सुचत नाहीये. आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला 5 असे व्यवसाय सांगणार आहे जे माझ्या माहिती प्रमाणे कधीच बंद पडणार नाहीत. (These businesses will never close) या जगामध्ये कितीही संशोधन होऊ द्या, तंत्रज्ञान विकसित होऊ द्या हे पाच असे व्यवसाय आहेत जे भविष्यात कधी बंदच होणार नाहीत.

पहिले आहे, वाहतूक. मित्रांनो वस्तू असू द्या किंवा मग तो मनुष्य असू द्या त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जावेच लागेल. मला असे वाटत नाही की तंत्रज्ञान असे येईल की माणसाला मशीन मध्ये टाकले आणि पाच हजार किलोमीटर अंतरावर तो त्या मशीन मधून बाहेर येईल.(These businesses will never close) हा सांगता येत नाही कारण आपल्याकडे फार हुशार शास्त्रज्ञ आहे. पण सध्यातरी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणसाला ट्रान्सफर करू शकत नाही.

त्यामुळे तुम्ही जर असा व्यवसाय करता जो वाहतुकीच्या संबंधित आहे, मग तो रेल्वेच्या संबंधित असेल, विमानाशी संबंधित असेल, पाण्यावरच्या जहाजाशी संबंधित असेल तर त्या व्यवसायाला अंत नाही. (These businesses will never close) याचप्रकारे प्रॉडक्ट्स, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तुम्हाला वाहतुकीनेच घेऊन जावे लागेल. फ्रीज, मोबाईल, फर्निचर खायचे समान एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला वाहतुकीचाच वापर करावा लागेल त्यामुळे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुम्ही वाहतुकीशी संबंधित व्यवसाय सुरू करता तर मी खात्रीने सांगतो तुम्ही आयुष्यभर काम कराल. आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे काम सोपवाल.

दुसरे आहे, संवाद. मित्रांनो जोपर्यंत माणूस या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो एकमेकांबरोबर संवाद साधेल कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्यामुळे त्याला कोणाबरोबर तरी बोलावेच लागेल. मग तो टेलिफोनवर बोलेल, मोबाईलवर बोलेल, इंटरनेटवरून बोलेल, तो फॅक्सचा वापर करेल किंवा उद्या एखादे नवीन संशोधन झाले तर त्याचा वापर करून सुद्धा तो संवाद साधेलच. (These businesses will never close) त्यामुळे कम्युनिकेशन संबंधित जे जे व्यवसाय आहेत ते मला नाही वाटत कधी संपतील. त्यामुळे कम्युनिकेशनची तुम्ही साधने बनवा. त्यांचे पार्ट्स बनवा किंवा स्वतःचे कॉल सेंटर चालू करा. काहीही करा पण हा कम्युनिकेशन संबंधित व्यवसाय नेहमी चालू रहाणारा व्यवसाय आहे.

ज्या तिसऱ्या कामाबद्धल मी बोलणार आहे तो लाखो वर्षांपासून चालत आला आहे आणि पुढचे काही लाख वर्ष चालू राहील. आणि तो व्यवसाय आहे जेवणाचा. माणूस काही ना काही खाणारच मग तो चपाती भाजी खाईल, पिझ्झा-बर्गर खाईल किंवा ईडली-डोसा खाईल. (These businesses will never close) पण त्याला नेहमी काहीतरी खायला लागणारच. मला नाही वाटतं की येत्या शंभर वर्षामध्ये असं काही तंत्रज्ञान निघेल की माणूस बिना खाता-पिता राहू शकेल. त्यामुळे खाण्या संदर्भात तुम्ही कोणताही व्यवसाय करता मग तुम्ही छोटीशी वडापावची गाडी टाका किंवा मोठे हॉटेल उघडा खाण्यासंबंधित व्यवसायाला अजिबात अंत नाही.


चौथा आहे, कपड्याचा व्यवसाय. मित्रांनो माणूस बिनाकपड्याचा फिरू तर शकणार नाही. काहीतरी कपडे घालेलच मग तो कॉटनचे कपडे घालेल, फॅब्रिकचे कपडे घालेल, नायलॉनचे कपडे घालेल, कागदाचे कपडे घालेल किंवा उद्या काही नवीन संशोधन झाले तर त्याने बनवलेले कपडे घालेल. (These businesses will never close) पण त्याला काहीतरी घालावे तर लागेलच. कारण माणूस ज्या दिवशी सुसंस्कृत झाला त्यादिवसापासून त्याने कपडे घालायला सुरुवात केली. त्यामुळे तुम्ही कापड्या संदर्भात कोणताही व्यवसाय करा मग तो रेटेलिंगचा असेल, होलसेलचा असेल, डायरेक्ट उत्पादन असेल किंवा डायरेक्ट सेलिंग असेल ही तुमची मर्जी आहे. पण हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही.


पाचवे आहे, घर म्हणजे रिअल इस्टेट. मित्रांनो या जगात माणसाला राहण्यासाठी, झोपण्यासाठी घर हे लागणारच आहे. हा मला मान्य आहे की काही व्यवसायामध्ये तात्पुरती मंदी येऊ शकते जसे की सध्या रिअल इस्टेटमध्ये आहे. पण हा व्यवसाय कधीच बंद होणार नाहीये. त्यामुळे रिअल इस्टेट संबंधित,(These businesses will never close) कन्स्ट्रक्शन संबंधित जसे की काही गोष्टी विकायच्या असतील, काही गोष्टी घ्यायाच्या असतील, काही कॉन्ट्रॅक्ट घ्यावे लागतील ती तुमची मर्जी आहे. रिअल इस्टेट संदर्भात थोडे तुम्ही रिसर्च केले तर तुम्हाला हजारो व्यवसाय सापडतील ज्याची मार्केटमध्ये आज गरज आहे. मित्रांनो हे होते ते पाच व्यवसाय जे मला वाटत नाही कधी बंद होतील. 

मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.

Source  - marathiviralstory



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!