सुनील मनोहर गावसकर / Sunil Manohar Gavaskar



 सुनील मनोहर गावसकर

(१० जुलै १९४९)


क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू. याचा जन्म मुंबईत झाला. तेथील सेंट झेवियर्स शाळा व त्याच नावाच्या महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. १९७० मध्ये त्याने बी.ए. ची पदवी संपादन केली. १९७४ मध्ये त्याचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन हा एक मुलगा आहे. गावसकरचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याचे एक मामा माध्व मंत्री ह्यांनी ही भारतातर्फे कसोटी सामन्यात भाग घेतला होता. शिवाय त्याचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. ह्या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनीलला लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिले. आपण चांगला फलंदाज बनणार, हे त्याने प्रथमपासून ठरविले होते. लहानपणापासून खेळताना बाद न होण्याच्या जिद्दीने तो खेळत असे.

शाळेच्या कनिष्ठ संघात असल्यापासूनच त्याने फलंदाजीचे तंत्र आत्मसात केले. बॅट सरळ कशी धरायची, बॅटवरची हाताची पकड कशी ठेवायची आणि झेल उडू नये म्हणून कोणता पवित्रा घ्यायचा, या बाबतींत त्याला प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांचे मार्गदर्शन मिळाले. गावसकर मुंबईच्या आंतरशालेय हॅरिस ढाल स्पर्धेत (१९६५-६६) खेळला. त्याच वर्षीच्या कुचबिहार करंडक सामन्यात पश्चिम विभागाच्या संयुक्त शालेय संघातर्फे खेळताना गावसकर याने एकूण ७६० धावा काढल्या होत्या. यामुळे कसोटीत लंडन शालेय संघाविरुद्ध त्याने शतक झळकावले. त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट शालेय खेळाडूसाठी असलेला जे. सी. मुखर्जी करंडक त्याला मिळाला. यानंतर त्याने आपले क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि यष्टीजवळील, विशेषकरून स्लिपमधील जागेवरील, क्षेत्ररक्षणात प्रावीण्य संपादित केले. महाविद्यालयात गेल्यावर त्याला दर शतकामागे वडिलांकडून दहा रुपये प्रोत्साहन म्हणून मिळत. महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्याने गुजरात विद्यापीठाविरुद्ध शतक ठोकले. आंतरविद्यापीठ सामन्यांत मुंबई विद्यापीठाकडून खेळताना त्याचा वेस्ट इंडीजच्या हंट याच्याशी परिचय झाला.


फटका मारण्याआधी बॅट उचलून मागे सरण्याचा (बॅक लिफ्ट) पवित्रा, बॅट खूपच सरळ आणि उंच उचलणे व डावा पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत पुढे ताणणे, या हंटच्या तंत्रावर त्याने स्वत:चे फलंदाजीचे तंत्र बेतले. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू देणाऱ्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लब चा सुनील सभासद झाला (१९६९). विझी करंडकासाठीच्या आंतररविद्यापीठ विभागीय सामन्यात त्याने पश्चिम विभागाचे नेतृत्व करून हा करंडक जिंकला १९६९. पुढच्या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ संघाने रोहिंग्टन बारिया करंडक जिंकला. त्याच वर्षी तो भारतीय संयुक्त विद्यापीठ संघाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला. तसेच श्रीलंकेत उपकर्णधार म्हणूनही तोगेला होता. तिकडे त्याने बलाढ्य अशा तेथील अध्यक्षीय संघाविरुद्ध द्विशतक केले. १९७०-७१ मध्ये पुण्यात झालेल्या आंतरविद्यापीठ सामन्यात ३२७ धावाकाढून त्याने बारा वर्षांपूर्वी अजित वाडेकर यानी केलेला ३२४ धावांचा विक्रम मोडला.


वेस्ट इंडीजला जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली १९७१. ही त्याची पहिली कसोटी मालिका. पाच सामन्यांच्या ह्या मालिकेतील फक्त चारसामन्यांत तो खेळला. त्यांत त्याने एकंदर ७७४ धावा काढल्या. त्यांत त्याची चार शतके होती. त्यांपैकी एका कसोटीतच एका डावात शतक व दुसऱ्यातद्विशतक काढून त्याने डग वॉल्टर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. यामुळे शेष विश्वसंघात त्याची निवड होऊन तो ऑस्ट्रेलियात गेला. तेथे सर डॉनब्रॅडमनच्या हस्ते त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक मिळाले होते. एकूण ४७ कसोटी सामन्यांत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी ९ सामनेभारताने जिंकले व ३० अनिर्णित राहिले.


गावसकरने आपल्या पहिल्या हजार धावा ११ कसोटीतील २१ डावांत काढल्या होत्या. त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यांपैकी काही विक्रमपुढीलप्रमाणे : सलगपणे १०२ कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम (१९७६), कसोटीत तीन वेळा दोन्ही डावांत शतक काढण्याचा विक्रम (१९७१,१९७८, १९७८-७९); लागोपाठच्या तीन डावांत शतके काढण्याचाही विक्रम दोन वेळा केला. त्याने शंभरांहून अधिक धावांच्या ५८ भागिदाऱ्या केल्या. प्रथमजाऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम दोनदा केला (१९७४-७५ च्या इराणी करंडकाचा सामना आणि १९८२-८३ चा फैसलाबाद येथीलपाकिस्तानविरुद्धचा सामना). सोबर्सचा सर्वाधिक ८,०३२ धावांचा विक्रम बॉयकॉट याने १९३ डावांत (१०८ कसोटी सामन्यांत), तर गावसकरने १६८डावांत (९६ कसोटी सामन्यांत) मोडला. यातील शेवटचा सामनापुरा झाला तेव्हा ६५ अर्धशतके (२९ शतके व ३६ अर्धशतके) काढण्याचा आणि एकाकॅलेंडर वर्षात १००० धावा चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रमही त्याने केला; ८० डावांत (५२ कसोटी सामन्यांत) ब्रॅडमनने केलेल्या २९ शतकांचीबरोबरी गावसकरने १६६ धावांत (९५ कसोटी सामन्यांत) केली. २१४ पैकी १९१ डावांमध्येच तो सलामीचा फलंदाज म्हणून खेळला व ह्यात एकूण १९खेळाडूंनी त्याला साथ दिली; १९८७ मध्ये ३४ कसोटी शतके व १० हजारांहून जास्त धावा (१०,१२२) काढणारा गावसकर हा एकमेव भारतीय खेळाडूठरला.


कसोटी सामन्यांशिवाय एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत, तसेच इराणी, दुलीप व रणजी करंडक स्पर्धांतही तो खेळला आहे. दुलीप करंडकातपदार्पण केले तेव्हाच त्याने शतक ठोकले व त्यात त्याने संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय कसोटी सामन्यात त्याने आघाडीचा गोलंदाज म्हणून (६३.२ षटके- १ बळी) कामगिरी निभावून नेली. कसोटी सामन्यांत त्याने एकूण १०८ झेल घेतले. तंत्रशुद्ध शैली, संयम व समतोलपणा, मेहनत (सराव), अभ्यासू वजिज्ञासू वृत्ती, समोरच्या खेळाडूचे गुणदोष चटकन लक्षात घेणे व खेळावर चित्त एकाग्र होणे, तसेच स्वत:चे तंत्र कुठे चुकत असेल तर जेष्ठ खेळाडूकडूनसमजावून घेऊन ते सुधारण्याचा प्रयत्न करणे, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. यष्टीजवळ क्षेत्ररक्षण करताना इतरांच्या फलंदाजीतील बारकाव्यांचेही तोनिरीक्षण करी. परिणामी तो सर्व प्रकारचे फटके मारू शकत असल्यामुळे त्या काळातील जगातील सर्व गोलंदाजांची, विशेषत: आघाडीचा फलंदाजअसल्याने जलदगती गोलंदाजांची, गोलंदाजी त्याला यशस्वीपणे खेळता आली. क्रिकेटविषयीचे तांत्रिक ज्ञान, नियम आणि या खेळामागची कणखरवृत्तीही त्याने चांगली समजून घेतली होती. कर्णधार असताना त्याला व एकूणच भारतीय संघाला या सगळ्यांचा उपयोग झाला. थोडक्यात सुनीलगावसकर हा खरा अभ्यासू खेळाडू होय. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने इर्षा निर्माण केली. क्रिकेटपटूंचे हितसंबंध सांभाळण्याचे कामही त्याने तत्परतेने केले.खेळातून निवृत्त झाल्यावरही त्याची हीच वृत्ती दिसून येते. कारण क्रिकेटचे सर्वांगीण प्रशिक्षण देणारी एक मोठी संस्था उभारण्याचे त्याचे प्रयत्न चालू आहेत.त्याचे अनुकरणीय गुण म्हणजे निर्व्यसनीपणा, मितहार, नियमितपणा आणि सध्याच्या काळात दुर्मिळ अशी मातृपितृभक्ती हे होत.


सुनील गावसकरच्या क्रिकेटमधील या महान कामगिरीचा गौरव झाला असून त्यास याबद्दल भरपूर मानसन्मान लाभले आहेत. त्यांपैकी काहीमानसन्मान पुढीलप्रमाणे आहेत : पी. जे. हिंदू जिमखान्यातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला देण्यात येणारे एल्. आर. तेरसी सुवर्णपदक (१९७०-७१व १९७५-७६ असे दोनदा); हंगामातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून मिळालेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जस्टीस तेंडुलकर करंडक (१९७०-७१);शिवछत्रपती पुरस्कार (१९७१-७२); उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी असलेले एस. व्ही. राजाध्यक्ष पारितोषिक (१९७२-७३); अर्जुन पुरस्कार (१९७७); पद्मभूषण(१९७९); विस्डेनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार (१९८०); मुंबईच्या वानखेडे क्रीडासंकुलातील एका भागाला ‘सुनील गावसकर कक्ष’ हे नाव (१९८५);क्रिकेटच्या अलंकार हे ब्रॅडमनचे उद्गार वगैरे. अन्नमलाई विद्यापीठाने त्याला डॉक्टरेटची पदवी दिली आहे. मुंबईचे ‘नगरपाल’ हे पदही त्याने भूषविले आहे(१९९४-९५). भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २५ लाख रु रोख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असणारा २०११-१२ चा सी. के. नायडू जीवनगौरवपुरस्कार सुनिल गावसकर यांना प्रदान केला आहे.


सुनील गावसकर याने सनी डेज (१९७६), आयडॉल्स (१९८३), रन्स इन रुइन्स (१९८४) आणि वन डे वंडर्स (१९८५) ही पुस्तके लिहिलीआहेत. इंडियन क्रिकेटर या नियतकालिकाचा तो संपादक होता. शिवाय तो नियतकालिकांत क्रीडाविषयक स्तंभलेखन करतो. त्याने एका चित्रपटात वअनेक जाहिरातपटांत काम केले असून दूरदर्शनवर क्रिकेटविषयक मालिकांचे समालोचनही केले आहे.




लेखक : प्रकाश श्री. साठ्ये


स्त्रोत : मराठी विश्वकोश

-----------------------------------------------------------------------------------


English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Sunil Manohar Gavaskar

(10 July 1949)

A famous Indian player who has made many international records in cricket. He was born in Mumbai. He was educated at the St. Xavier's School and the same college. He passed his BA in 1970. Graduation was edited. In 1974, he married Marshanjeet Mehrotra. They have a son Rohan. Gavaskar's father and uncle were good cricketers. One of his mother-in-law ministers had participated in a Test match by India. Besides, both his grandfather and mother had special love for cricket. Sunil has developed a passion for cricket since his childhood. All the people in the house encouraged him to play cricket. He had decided that he would become a better batsman. He played with the stubbornness of playing in a childhood.

From the time he was in the junior team of the school, he realized the technique of batting. In this regard, he got guidance from famous coach Kamal Bhandarkar, how to hold the bat straight, how to keep a watch on the bat, and what kind of a holy person should take a catch. Gavaskar played in Mumbai's Interstate Harris Shield Championship (1965-66). Gavaskar scored 760 runs in the Kuchibhar Trophy match of the West Zone joint school team in the same year. This led to his century against the London School of Sports in Tests. For the best school player of that year, C. Mukherjee got him the trophy. After that, he took a lot of effort to improve his fielding and edited fielding skills in field, particularly in slip, fielding. After going to college, he gets ten rupees from the elders for every century. When he made his debut in college, he scored a hundred against Gujarat University. He was introduced to the West Indies' Hunt while playing in the Inter University matches from the University of Mumbai.

Before battling the bat, the back lift will be holy, the bat is very straight, and lifting up the height and stretching the left foot to the stages of the ball, on the hunt technique, he got his technique of batting. Sunil became the member of the Dadar Union Sporting Club giving many famous cricketers (1969). In the Inter-University Divisional match for the Wisji Crore, he led the West Zone to win the trophy in 1969. In the next season, under the leadership of the Mumbai University team won the Rohingya Baria Trophy. In the same year he played against New Zealand from the United Nations United Nations team. It was also Togaela as vice-captain in Sri Lanka. He has done a double hundred against the presidential squad. He broke the record of 324 runs scored by Ajit Wadekar 12 years ago, after scoring 327 runs in the Inter-University match in Pune in 1970-71.

He was selected in the squad for the West Indies tour of 1971. This is his first Test series. He played just four games in this five-match series. He scored 774 runs in total. He had four centuries in it. In one of these tests, he scored a hundred in one innings and the other with a world record of double-digit walters. He was elected to the rest of the world and went to Australia. At the hands of Sir Donald Bradman, he had a great fielding prize. He led the Indian team in a total of 47 Test matches. India won 9 of these 9 and won 30 draws.

Gavaskar made his first 1000 runs in 11 innings of 21 innings. He has made many records in cricket; some of them are Vikrama Pillay. He is the world record holder in 102 Tests (1976); He has scored three centuries in Test innings (1971, 1983, 1978-79); Twice in three successive innings, he also scored a record twice. He made 58 partnerships of more than 100 runs. It was the first time that he made an unbeaten record twice in the match (the Irani Cup match of 1974-75 and the match against Pakistan in Faisalabad in 1982-83). Sobers has the record of 8,032 runs, including Boycott, in 193 innings (108 Tests), and Gavaskar has broken 168 innings (in 96 Tests). When he finished his final match, he also made a world record for the removal of 65 fifties (29 centuries and 36 fifties) and in the one-calendar year for 1000 runs in fourth year; Bradman's 29 centuries in 80 innings (52 Test matches) were played by Brian Gavaskar for 166 (95 Test matches). In 191 of 214, he played as the opening batsman and played a total of 19 games with him. In 1987, Gavaskar became the only Indian player to have scored 34 Test centuries and more than 10,000 runs (10,122).

He has played one-day internationals, besides Irani, Duleep and Ranji Trophy, without a Test match. When he made his debut in Duleep Trophy, he scored a century and in that he led the team. In addition, he took the lead as a leading bowler in Tests (63.2 overs - 1 wicket). He took 108 catches in Test matches. Improving the quality of temperament, temperament and balance, practice (practice), practice and curiosity, spotting the qualities of the other players, and concentrating on the game, and trying to improve it by explaining it to the senior players, Are there.

During fielding, he also supervised the batches of others' batting. As a result, he can hit all kinds of strokes, because of all the bowlers in the world, especially the leading batsmen, he has been able to play fast bowlers and bowling bowlers. He also understood the technical knowledge, rules and the skills of the game. He was the captain of the Indian team and the entire Indian team used all these things. In short, Sunilgaonkar is a true practitioner. In Indian cricket, he created jealousy. He also used to take care of the interests of the cricketer. Even after retirement, his attitude is seen. Because of his efforts to establish a large organization of all-round training. His exemplary qualities are of nirvishness, entertainment, regularity, and rarely the maternal love of the mother.

Sunil Gavaskar has been honored with this great achievement and he has received great respect for it. Some of them are honorable: P J. The Hindu Gymkhana will be given to the best cricketer of the country. R. Thirasi Gold Medal (twice as 1970-71 and 1975-76); Justice Cricketer of the Mumbai Cricket Association (1970-71); Shivchhatrapati Award (1971-72); Excellent fielder S. V. Raja prize prize (1972-73); Arjuna Award (1977); Padma Bhushan (1979); Wisden Best Debut Award (1980); One part of Mumbai's Wankhede sports club named 'Sunil Gavaskar Room' (1985); Bradman's exclamation of cricket's decorations and so on. Anamalai University has given him a doctorate degree. He has also served as the 'Nagarpal' of Mumbai (1994-95). The Board of Control for Cricket in India (BCCI) has a cash prize of Rs 25 lakh and a memorandum of 2011-12. K. Naidu has given life support to Sunil Gavaskar.

Sunil Gavaskar has written books such as Sunny Days (1976), Idols (1983), Runs in Ruins (1984) and One Day Wonders (1985). He was the editor of the Indian cricketer's magazine. Apart from this, he is a sports columnist in the periodicals. He has worked in many films in a film and commentary on the television series.

Author: Prakash Shree Sathye

Source: Marathi Encyclopedia