जनहित कलाकार विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश; मुजमुले
जनहित कलाकार विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश; मुजमुले
जिल्ह्यात विविध बँड पथकांमध्ये सुमारे 15 ते 20 हजार कलाकार आहेत. कोरोना महामारी आणि सततच्या लॉकडाऊन मुळे बँड कलाकारांवरती उपासमारीची वेळ आली होती.
लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना बँड शिवाय शोभा येत नाही. परंतु, कोरोना महामारीच्या काळात बँड कलाकारांवर बिकट परिस्थिती ओढवली होती.
याबाबत जनहित कलाकार विकास परिषदेने कलाकारांची होत असलेली परवड शासन- प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून देत पाठपुरावा केला.
नुकतीच जिल्हाधिकारी यांनी बँड पथकांना परवानगी दिली असून परिषदेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचं एड. नितीन मुजमुले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या सात- आठ महिन्यांपासून सर्वच व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र त्यामध्ये काही व्यवसायीकांचे छोटे- मोठे व्यवसाय चालू होते. परंतु बँड हा एकमेव असा व्यवसाय आहे, की बँड कलाकार त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
त्यामुळे जनहित कलाकार विकास परिषदेने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे व्यथा व कलाकारांसह त्यांच्या कुटूंबाची होत असलेली उपासमारीची वेदना त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले.
दरम्यान परिषदेने कलाकारांच्या मांडलेल्या व्यथांची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी बँड कलाकारांना शासनाने दिलेल्या नियम व अटींनुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क व हँडग्लोजचा वापर करून बँड वाजवण्यास परवानगी दिली असल्याचे एड. मुजमुले यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा