कविता :- चुकलचं जरा..... Poem: - Make a mistake .....

 


चुकलचं जरा...

आपल्या माणसांसाठी धडपडताना

स्वतःचा कधी विचारचं केला नाही

कळलं... तेव्हा... वेळ निघून गेली होती


चुकलचं जरा...

इमानदारीचं लेबल मिरवताना

काय कमवलं... कधी कळलंच नाही

गमवलं... तेव्हा... वेळ निघून गेली होती


चुकलचं जरा...

सहचारिणी बरोबर आयुष्य घालवताना

तिला काय हवंय... कधी कळलंच नाही

उमगलं... तेव्हा... वेळ निघून गेली होती


चुकलचं जरा...

आयुष्याची गोळाबेरीज करताना

वजाबेरीज कधी करायची...कधी कळलंच नाही

कळलं... तेव्हा... वेळ निघून गेली होती


चुकलचं जरा...

आयुष्यातील भूमिका निभावतना

वेळ कशी साधायची...कधी कळलंच नाही

समजलं... तेव्हा... वेळ निघून गेली होती

खरचं... चुकलचं जरा


@ Prashant

तुम्हाला ही मराठी कविता कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कॉमेन्ट करा, शेअर करा.